Ad will apear here
Next
नरेंद्र काळे यांचा जीवनपट मांडणारे ‘आय अॅम’ प्रकाशित
‘आय अॅम’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आमदार बालाजी किणीकर, नरेंद्र काळे, ज्येष्ठ अभिनेते व लेखक प्रसाद पंडित व लेखिका अवनी कर्णिक

ठाणे : ‘एक वाया गेलेला मुलगा ते यशस्वी, कर्तबगार उद्योजक अशी वाटचाल करणाऱ्या नरेंद्र काळे यांच्या आयुष्यावरील अवनी कर्णिक यांनी लिहिलेल्या ‘आय अॅम’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ अभिनेते व लेखक प्रसाद पंडित आणि आमदार बालाजी किणीकर याच्या हस्ते झाले.  
 
या वेळी बोलताना लेखिका अवनी कर्णिक म्हणाल्या, ‘काही वर्षापूर्वी, एकदा गप्पांच्या ओघात, नरेंद्र काळे यांनी मला ते त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव डायरीत लिहित असल्याचे सांगितले होते. मला त्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. नंतर  नरेंद्र काळे यांनी ती डायरी मला वाचण्यास दिली. वाचताना त्यांच्या जीवनपटाचा उलगडा झाला. अत्यंत नाट्यमय प्रसंगानी त्यांचे आयुष्य भरलेले आहे. याची जाणीव झाली. पालकांनी घेतलेल्या अचानक निर्णयानुसार इयत्ता सहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेला विद्यार्थी, थेट इंग्रजी माध्यमात दाखल झाला. इंग्रजीचा फारसा गंध नव्हता. त्यामुळे शाळेत हेटाळणी, उपेक्षा अनुभवायला आली. बालपण करपून टाकणारे हे अनुभव त्या मुलाला बिनधास्त बनवत गेले. खोडकरपणा वाढत गेला. शाळा, कॉलेज बुडवून बाहेर भटकणे, मारामाऱ्या, कॉपी करून पास होणे असे प्रकार घडू लागले. अशीच वाटचाल सुरू असताना, एक वेगळे वळण मिळाले आणि ही उनाड पावले विधायक कार्याकडे वळली. समाजकारण आणि ओघाने काही काळ राजकारणात गेल्यानंतर त्यांनी उद्योगक्षेत्राकडे आपला मोहरा वळवला. व्यवसायात उत्तम यश प्राप्त करून एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी समाजात मानाचे स्थान मिळवले. एक वाया गेलेला ‘गोट्या’ समाजात मानाच्या स्थानावर पोहोचला. हा सगळा प्रवास विलक्षण होता. तो जाणून घेतल्यानंतर पुस्तक लिहिण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला नकार देणे शक्यच नव्हते. त्यांनतर काही महिन्यांच्या परिश्रमातून ‘आय अॅम’ हे पुस्तक साकारले. लेखक म्हणून ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.’

‘‘आय अॅम’ हे पुस्तक केवळ नरेंद्र काळे या एकाच व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते सर्वांनाच आपले वाटू शकते. प्रत्येकाला हे पुस्तक स्वत: मधील ‘आय अॅम’ शोधण्यासाठी प्रेरित करेल,’ असेही कर्णिक यांनी नमूद केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZWDBW
Similar Posts
ठाणे येथे संस्था बळकटीकरणावर कार्यशाळा ठाणे : येथील साद फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट यांच्या विद्यमाने अंबरनाथ पूर्व येथील शांताराम जाधव ज्येष्ठ नागरिक सभागृहात ‘संस्था बळकटीकरण’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात ठाणे जिल्ह्यातील अनेक संस्थांचे विश्वस्त सहभागी झाले होते.
अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि परिसर... ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण ठाणे जिल्ह्यातील पारसिक हिलपासून सिद्धगड-माळशेज घाटापर्यंतची पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या उल्हासनगरपासून मुरबाडपर्यंतची पर्यटनस्थळे.
‘अपयशाने खचून न जाता नव्याने यश मिळवू या’ अंबरनाथ : ‘ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाचा जिल्हा असून, या जिल्ह्यात सर्वाधिक ताकद निर्माण करायची आहे. कितीही अपयश आले, पडझड झाली, तरी त्याने खचून न जाता आपल्याला चांगल्या पद्धतीने यश मिळवायचे आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे ‘करू या देशाटन’ या सदराच्या गेल्या भागात आपण ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आदी परिसरातील पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language